About us

संस्थेची ओळख

Market Yard Sangli

संस्थेची ओळख

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली

भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हफ्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली आणि म्हणूनच नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची स्थापना १७ जानेवारी १९५१ रोजी झाली व १६ जुलै १९५१ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली.

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीचा, मुख्य बाजार आवार हा वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे एकूण ८७ एकर जागेवर व्यापलेला आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. 

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली. ही एक अग्रगण्य बाजार समिती आहे. विशेषतः बेदाणा व हळदीच्या बाबतीत संपुर्ण भारतात अग्रेसर आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर ही बाजार पेठ असलेने या पेठेमध्ये विक्रीस येणारा गुळ, मिरची, मका, ज्वारी या शेती मालापैकी ८०% माल कर्नाटक मधून येतो. हळद हा शेतीमाल आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडु या राज्यातुन येतो. सांगली ही बाजारपेठ बारमाही सुरु असणारी बाजारपेठ आहे. भारत सरकारने सांगली येथे हळद वायदे बाजाराचे केंद्र स्थापन केले आहे. बाजार आवारातील सर्व घटकामध्ये कायदा व व्यवहाराची सांगड घालुन बाजार समिती शेतीमालाचे नियमनाचे काम करित असलेमुळे दैनंदिन व्यवहार वाढत असून प्रगती अत्यंत समाधान कारक आहे.

सांगली येथे मुख्य बाजार आवार असून मिरज, कवठे महांकाळ व जत असे तीन तालुके बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात येतात. त्याचा तपशिल खालील प्रमाणे -
  • सांगली मुख्य बाजार आवार – एकुण क्षेत्र ३५ हेक्टर असून ही जागा बाजार समितीच्या स्वः मालकीची आहे.
  • फळे व भाजीपाला- सांगली कोल्हापूर रोडवर फळे व भाजीपाला मार्केटची जागा ४.७८ हेक्टर असून ही जागा बाजार समितीच्या स्वः मालकीची आहे. 
  • सांगली जनावरे दुय्यम बाजार आवाराची १.४० हेक्टर जागा आहे.
  • शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार, मिरज आवाराची ९.८५ हेक्टर 2 जागा स्वः मालकीची आहे.
  • विठ्ठल दाजी पाटील दुय्यम बाजार आवार, कवठेमहांकाळ आवाराची ८.७८ हेक्टर जागा स्वः मालकीची आहे.
  • ढालगांव दुय्यम बाजार आवार, ढालगांव आवाराची ३.६० हेक्टर जागा स्वःमालकीची आहे.
  • श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार, जत आवाराची १२.६५ हेक्टर जागा स्वः मालकीची आहे.
  • बी. आर. शिंदे दुय्यम बाजार आवार, माडग्याळ आवाराची १० एकर ४ गुंठे जागा स्वः मालकीची आहे.
  • दुय्यम बाजार आवार, सावळी आवाराची 6.33 हेक्टर जागा स्वःमालकीची आहे.
  • दुय्यम बाजार आवार, उमदी आवाराची 3.20 हेक्टर जागा स्वः मालकीची आहे.
  • सदर बाजार आवारात कंपाउंड भिंत, व्यापारी गाळे, रस्ते, गटारी, लाईट व्यवस्था, सुलभ शौचालय, पाण्याची टाकी, कॅन्टीन इमारत, शेतकरी निवास, ऑक्शन प्लॅटफॉर्म इत्यादी सुविधा बाजार समिती मार्फत करणेत आली आहे.

बाजार आवारातील आवक बाबत माहीती: सांगली मार्केट यार्डमध्ये गुळ, मिरची, हरभरा, मका व वेदाणा या शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामध्ये गुळाची आवक 1686420 क्विटल, मिरची आवक 11313 क्विंटल, हळद आवक 1449051 क्विंटल, सोयाबीन आवक, 10161 क्विंटल, हरभरा आवक क्विंटल, 7206 मका आवक 1043306 क्विंटल, बेदाणा आवक 877832 क्विंटल एवढी झाली आहे. या बाजार आवारात विक्रीस येणारा शेतमाल हा उघड लिलाव पध्दतीने विक्री केला जातो. त्यामध्ये काही वेळा दर व क्वॉलीटी बावतचे वांध्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारची वांदी बाजार समिती मार्फत प्रत्यक्ष बोलावून सोडविली जातात जर वांदा गंभीर स्वरूपाचा असेल तर अशा प्रकारची वांदी वांदा उपसमिती पुढे निर्णयासाठी ठेवणेत येतात व त्यावर तोडगा काढणेत येतो.

बाजार समितीची सांपत्तीक स्थिती बाजार फी, अनुज्ञप्ती फी व इतर बाबी मिळून बाजार समितीचे सन 2023-24 चे एकुण उत्पन्न रु 15,22,76,179/- मात्र असुन सर्व खर्च रक्कम रु 17,48,47,810/- मात्र वजा जाता तुट रक्कम रु 2,25,71,631/- मात्र इतकी आहे. तसेच एकुण बँक मुदत ठेवी रक्कम रु 6,61,37,647/- मात्र इतकी आहे.

प्रचार व प्रसिध्दी :  सांगली बाजार आवारात येणा-या शेतीमालाची आवक, विक्री, दर या बाबतची माहिती सबंधीत घटकांना होणेसाठी दैनंदिन दैनिक पेपर, आकाशवाणी, वेबसाईट या माध्यमातुन प्रसिध्द केले जातात.

जनावरे बाजारः सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, ढालगांव (ता. कवठेमहांकाळ) माडग्याळ (ता. जत) येथे जनावरांचे बाजार अनुक्रमे शनिवार, बुधवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवार असे भरत असतात. जनावरांचे बाजारात पाण्याचे हौद, पाण्याची टाकी, वृक्षारोपण, लोडींग-अनलोडिंग कट्टे, जनावरांचे शेड, लाईट व्यवस्था ईत्यादी सुविधा केल्या आहेत.

स्थापनेचा उद्देश

सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या तरतुदींनुसार करण्यात आली. या संस्थेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे आणि त्यांना न्यायप्राप्त दर मिळवून देणे हा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि शेतीमाल विक्री व्यवस्थेत सुधारणा करणे हे बाजार समितीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीची खास वैशिष्ठ्ये

आशिया खंडातील हळदीची अग्रेसर बाजारपेठ

शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी सर्वसोयीनी युक्त असे भव्य मार्केट यार्ड.

सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक भवन.

शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय.

मालाची त्वरीत विक्री व्यवस्था आणि हिशोबपट्टीची रक्कम सत्वर देणेची सोय.

मालाच्या प्रतवारीची सोय उपलब्ध.

शेतमालाची विक्री उघड लिलाव पध्दतीने.

शेतमालाची चोख वजनमाप व्यवस्था.

शेतमाल साठविण्यासाठी भव्य गोदामाची सोय.

जनावरांकरीता भव्य बाजार आवार.

जनावरांकरीता गोठ्याची उत्तम सोय.

जनावरांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था.

रोजच्या रोज बाजारभाव प्रसिध्दी

आशिया खंडातील हळदीची अग्रेसर बाजारपेठ

शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी सर्वसोयीनी युक्त असे भव्य मार्केट यार्ड.

सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक भवन.

शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय.

मालाची त्वरीत विक्री व्यवस्था आणि हिशोबपट्टीची रक्कम सत्वर देणेची सोय.

मालाच्या प्रतवारीची सोय उपलब्ध.

शेतमालाची विक्री उघड लिलाव पध्दतीने.

शेतमालाची चोख वजनमाप व्यवस्था.

शेतमाल साठविण्यासाठी भव्य गोदामाची सोय.

जनावरांकरीता भव्य बाजार आवार.

जनावरांकरीता गोठ्याची उत्तम सोय.

जनावरांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था.

रोजच्या रोज बाजारभाव प्रसिध्दी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील
सभापती व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ

माजी सभापती

माजी उपसभापती

माजी सचिव