New Updates
  • केंद्र शासनाने खरीप पिकांच्या कृषि मालाच्या खरीप हंगाम २०२५-२०२६ साठी किमान आधारभूत किंमती (MINIMUM SUPPORT PRICE) दर खालील प्रमाणे जाहीर केलेले आहे. सर्व अनुज्ञप्तीधारक आडत्या, खरेदीदार, व्यापारी, दलाल व इतर सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली

Market Yard Sangli

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली

भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हफ्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्‍यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली आणि म्हणूनच नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची (Market Yard Sangli) स्थापना १७ जानेवारी १९५१ रोजी झाली व १६ जुलै १९५१ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली.

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीचा (Market Yard Sangli), मुख्य बाजार आवार हा वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे एकूण ८७ एकर जागेवर व्यापलेला आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्‍यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे.

बाजार समितीची कार्यप्रणाली

सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीत खालील बाबींचा समावेश होतो:

न्यायप्राप्त खरेदी-विक्री व्यवहार

शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांना फसवणूक होऊ नये यासाठी खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते.

विक्री
व्यवस्थापन

शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री योग्य व्यवस्थेमार्फत केली जाते. प्रत्येक व्यवहार नोंदणी करून त्याचा हिशेब ठेवला जातो.

आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर

बाजार समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवहार अधिक सोपे आणि वेगवान केले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना डिजिटल सुविधांचा लाभ घेता येतो.

सुविधा

बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, गोदामे, वजन मापन यंत्रे, आणि वाहतुकीची सुविधा पुरवली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.

सांगली बाजार समितीतील प्रमुख उत्पादने

गुळ

मका

हळद

बेदाणा

मिरची

नवीन बातम्या

बाजार समिती पदाधिकारी, सचिव कार्यशाळेस प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी कृषि कोल्हापूरचे पणन मंडळ विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, ‘डीएमआय’चे अच्युत…

आंबा महोत्सवात ३३ लाखांची उलाढाल

राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सांगली आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १८ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या आंबा महोत्सवामध्ये ३३.६० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची…

सांगलीतील आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वसंतदादा मार्केट यार्डमधील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन येथे ‘आंबा महोत्सव’ सुरू आहे. या आंबा महोत्सव सांगलीकर मोठा प्रतिसाद देत आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या विविध प्रजातीच्या आंब्यांची खरेदी…

सांगली बाजार समितीत आंबा महोत्सव

राज्य कृषी पणन मंडळ पुणे, व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ८ ते १२ मे दरम्यान वसंतदादा स्मृतिभवन, वसंत मार्केट यार्ड येथे सांगली आंबा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक…