
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ शुक्रवारी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली. शुक्रवारी दिनांक १७/०१/२०२५ रोजी सकाळी १० वाजता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय वसंत मार्केट यार्ड येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्य कार्यालयात नियमन विभागाच्या अद्ययावत कक्षाचे उद्घाटन होणार आहे. वर्षभर शेतकरीउपयोगी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, तसेच बाजार समितीची नवीन वेबसाईट निर्मिती केली आहे, त्याचे उद्घाटन होणार आहे. याद्वारे बाजार समितीच्या विविध उपक्रमांची शेतीमाल बाजारभावाची माहिती होणार आहे.

