राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सांगली आंबा महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १८ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या आंबा महोत्सवामध्ये ३३.६० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.


