सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सोयाबीन हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णूअण्णा खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड येथे सुरू करण्यात आले. या केंद्रात ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन हमीभाव योजनेंतर्गत खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते झाला.


