महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी कृषि कोल्हापूरचे पणन मंडळ विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, ‘डीएमआय’चे अच्युत सुरवसे, सहकार विभागाचे तात्यासाहेब मुरूडकर, पणन मंडळाचे ओंकार माने, शेखर कोंडे, नवनाथ मोरे, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्यासह इतर बाजार समित्यांचे पदाधिकारी व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


