मार्केट यार्डात सेस चुकवेगिरीबाबत तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत. येणाऱ्या आवकेची गेटवरच नोंद होऊन शेतीमालाची गाडी आवारात येईल. या वाहनाची ऑनलाईन नोंद बाजार समितीकडे होईल. आलेल्या गाडीमध्ये नेमका कोणता शेतीमाल असून त्याचे वजन किती याचीही नोंद होणार आहे. याशिवाय कोणत्या दुकानातून कोणत्या मालाची गाडी बाहेर गेली, याचीही माहिती मिळणार आहे. श्री. सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.


