सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन बेदाणा सौद्याचा प्रारंभ शुक्रवारी झाला. मुहूर्ताच्या सौद्यावेळी ३० टन बेदाण्याची आवक झाली. हिरव्या बेदाण्यास २२५ तर, पिवळया बेदाण्यास १९१ रुपये प्रति किलो भाव मिळाला, सौद्यामध्ये सरासरी हिरव्या नवीन बेदाण्यास १८० ते २२५ रुपये, मध्यम बेदाण्यास १३० ते १७० रुपये दर मिळाला.



