दिवाळी पाडव्यानिमित्त येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डमध्ये हळद सौदे काढण्यात आले.
त्यात राजापुरी हळदीला प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त १७ हजार रुपये दर मिळाला, तर कमीत कमी बारा हजार तीनशे रुपये दर राहिला.
तर गुळाच्या सौद्यात प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त साडेचार, तर कमीत कमी चार हजार रुपये दर निघाला. सांगलीची बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दिवाळी पाडव्याच्या मुहर्तावर सौदे काढण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार शनिवारी सौदे काढण्यात आले. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, व्यापारी प्रतिनिधी काडप्पा वारद, प्रशांत पाटील मजलेकर, संचालक शशिकांत नागे, विकास मोहिते, शरद शहा, मारुती बंडगर, समितीचे सचिव महेश चव्हाण, व्यापारी, अडते, हमाल उपस्थित होते.


