महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वसंतदादा मार्केट यार्डमधील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन येथे ‘आंबा महोत्सव’ सुरू आहे. या आंबा महोत्सव सांगलीकर मोठा प्रतिसाद देत आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या विविध प्रजातीच्या आंब्यांची खरेदी करावी असे आवाहन बाजार समिती सांगली मार्फत करण्यात येत आहे.


