कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषीपुरक स्टॉल्स लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुजय (नाना) शिंदे यानी माध्यमांशी बोलताना केले.


