राज्य कृषी पणन मंडळ पुणे, व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ८ ते १२ मे दरम्यान वसंतदादा स्मृतिभवन, वसंत मार्केट यार्ड येथे सांगली आंबा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून नागरिकांना उत्तम दर्जाचा, अस्सल नैसर्गिकरित्या पिकविलेले हापूस व केशर आंबे उपलब्ध होणार आहेत. या आंबा महोत्सवाचे आयोजन सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले.


