सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत हा दुष्काळी तालुका आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती साधली आहे. तालुक्यात प्रत्येकाच्या दावणीला खिलार जनावरे असतात. जत शहराच्या दक्षिणेला गंधर्व नदीच्या काठी श्री यल्लमादेवीचे प्राचीन मंदिर आहे. जत ही डफळे संस्थानाची राजधानी आहे. त्या काळापासून प्रत्येक मार्गशीर्षांत श्री यल्लम्मादेवीची यात्रा भरते. त्यास दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूहुन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.


