सांगली कृषी उत्पन बाजार समितीचे वसंतदादा मार्केट यार्ड येथे सदाशिव मल्लाप्पा शिंनदोळी (रा. गुरलापूर, ता. मोडलगी, जि. बेळगाव) या शेतकऱ्याच्या हळदीला ३०,००० प्रति क्विंटल हा उच्चांकी दर मिळाला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सांगली बाजार समितीचे सभापती सुजयनाना अशोकराव शिंदे यांनी केले.
सौजन्य : पुढारी वृत्तसेवा


