सांगलीत तुरीला ७५५० रुपयांचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्यावतीने नाफेड मार्फत तूर हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघ मार्केट यार्ड सांगली येथे सुरू करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक राहुल काकडे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्याहस्ते झाला. शेतकऱ्यांनी आपली तूर शेतमाल खरेदी-विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *