सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी हळद सौदे काढण्यात आले.
या सौद्यामध्ये राजापुरी हळदीस उच्चांकी १५,३००, तर कमीत कमी १३ हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला, सरासरी दर १४ हजार रुपये राहिला. समितीचे संचालक संग्राम पाटील यांच्याहस्ते हळद सौद्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक शशिकांत नागे, प्रशांत मजलेकर, काडापा वारद, सचिव महेश चव्हाण उपस्थित होते. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर १९६ क्विंटल नवीन हळदीची आवक होती, अशी माहिती समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.


