admin

admin

जत येथे बेदाण्याला उच्चांकी २९१ रुपये दर

जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवारात रविवार दिनांक-०२/०३/२०२५ रोजी बेदाणा सौद्याचा प्रारंभ झाला. सौद्यात पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातून २० टन बेदाण्याची आवक झाली. सौद्याचा प्रारंभ माजी सभापती बसवराज बिराजदार, बाजार समितीचे संचालक रमेश पाटील, सहायक…

जत यात्रेतील खिलार जनावरे बाजाराची सर्वदूर ख्याती

सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत हा दुष्काळी तालुका आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती साधली आहे. तालुक्यात प्रत्येकाच्या दावणीला खिलार जनावरे असतात. जत शहराच्या दक्षिणेला गंधर्व नदीच्या काठी श्री यल्लमादेवीचे प्राचीन मंदिर आहे. जत ही डफळे संस्थानाची राजधानी…

जत बाजार समिती झाली उडदासाठी महत्त्वाची बाजारपेठ

जत (जि. सांगली) तालुक्यात सांगली बाजार समिती अंतर्गत श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवाराची स्थापना १९६७ मध्ये झाली. या बाजार समितीत शेतकरी डाळिंब, करडई, कडधान्य घेऊन येतात. जत तालुक्यात पूर्वी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यामुळे ही बाजारपेठ भुईमुगासाठी प्रसिद्ध…

शेतकऱ्यांच्या हक्काचा मिरजेचा प्रसिद्ध फुलबाजार

मिरज (जि. सांगली) येथील श्यामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजारात वीस वर्षापासून फुलांचा बाजार भरला जातो. विविध प्रकारच्या फुलांची सातत्याने आवक, मर्यादित व्यापारी, चांगले दर व शेतकऱ्यांत विश्वासार्हता या वैशिष्टयांमुळे हा बाजार सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकातही प्रसिद्ध झाला आहे.

सांगलीमध्ये बेदाण्यास ३७१ रुपयांचा उच्चांकी दर

सांगली बाजार समिती आवारात बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चाकी 371 रुपये प्रति किलो भाव मिळाला. हा हिरवा बेदाणा विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला.यावेळी बेदाण्यास चालू वर्षी चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी नवीन बेदाणा…

निर्यात वाढल्याने दरात सरासरी दुपटीने वाढ

सांगली बाजारपेठेत गुणवतेच्या हळदीची आवक होते. देशभरातील व्यापारी येतात. इतर बाजारपेठेच्या तुलनेत या ठिकाणी चांगला दर निघतो, त्यामुळे येथे विक्रीसाठी हळद घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. -मा. सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती

मुहूर्ताच्या सौद्यावेळी हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड येथे नवीन राजापुरी हळद सौद्याचा प्रारंभ मंगळवारी झाला. पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्ति क्लिंटलला २१,३०० रुपये उच्चांकी दर मिळाला.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे म्हणाले, सांगली…

मुहुर्ताच्या सौद्यात बेदाण्याला २२५ रूपये भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन बेदाणा सौद्याचा प्रारंभ शुक्रवारी झाला. मुहूर्ताच्या सौद्यावेळी ३० टन बेदाण्याची आवक झाली. हिरव्या बेदाण्यास २२५ तर, पिवळया बेदाण्यास १९१ रुपये प्रति किलो भाव मिळाला, सौद्यामध्ये सरासरी हिरव्या नवीन बेदाण्यास १८० ते २२५ रुपये, मध्यम…

अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ शुक्रवारी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली. शुक्रवारी दिनांक १७/०१/२०२५ रोजी सकाळी १०…

मार्केट यार्डात सेस चुकवेगिरीला चाप

मार्केट यार्डात सेस चुकवेगिरीबाबत तक्रारी बाजार समितीकडे येत आहेत. येणाऱ्या आवकेची गेटवरच नोंद होऊन शेतीमालाची गाडी आवारात येईल. या वाहनाची ऑनलाईन नोंद बाजार समितीकडे होईल. आलेल्या गाडीमध्ये नेमका कोणता शेतीमाल असून त्याचे वजन किती याचीही नोंद होणार आहे. याशिवाय कोणत्या…